अमोल गोंडचवर यांच्या ‘पौर्णिमेची चंद्रकोर’चे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:18 IST2021-02-10T04:18:54+5:302021-02-10T04:18:54+5:30

अकोला : येथील प्रसिद्ध लेखक, ग्रामीण कथाकार, शिक्षक अमोल गोंडचवर यांच्या ‘पौर्णिमेची चंद्रकोर’ या कथासंग्रहाचे प्रकाशन ७ फेब्रुवारी ...

Publication of Amol Gondchavar's 'Pournimachi Chandrakor' | अमोल गोंडचवर यांच्या ‘पौर्णिमेची चंद्रकोर’चे प्रकाशन

अमोल गोंडचवर यांच्या ‘पौर्णिमेची चंद्रकोर’चे प्रकाशन

अकोला : येथील प्रसिद्ध लेखक, ग्रामीण कथाकार, शिक्षक अमोल गोंडचवर यांच्या ‘पौर्णिमेची चंद्रकोर’ या कथासंग्रहाचे प्रकाशन ७ फेब्रुवारी रोजी डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी जागर सभागृहात मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

या पुस्तकाला समर्पक मुखपृष्ठ वाशीम येथील नामांकित चित्रकार रा. मु. पगार यांनी दिले आहे. यातील बहुतांश कथा ग्रामीण जीवनावर, दारिद्र्य, गरिबी व व्यवस्थेबद्दल असलेली चीड यावर आधारित आहेत. गाेंडचवर यांची कथा ही ग्रामीण जनमानसाचे प्रतिबिंब असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रतिमाताई इंगोले हाेत्या. यावेळी अकाेला जिल्हा परिषदेचे बांधकाम, शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश पाचकवडे, तुळशीराम बोबडे, बापूराव झटाले, प्रा. मधुकर वडोदे, प्रा. मोहन काळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती हाेती. सूत्रसंचालन गोपाल मापारी व आभार प्रदर्शन मनोज लेखणार यांनी केले.

Web Title: Publication of Amol Gondchavar's 'Pournimachi Chandrakor'