स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी दुकानाच्या बिलातून जनजागृती
By Admin | Updated: February 14, 2015 01:38 IST2015-02-14T01:38:44+5:302015-02-14T01:38:44+5:30
कारंजा येथील ट्रक्टर व्यवसायिकाचा अभिनव प्रयोग.
_ns.jpg)
स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी दुकानाच्या बिलातून जनजागृती
दादाराव गायकवाड/ कारंजा (वाशिम):
स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबवित आहे, जनजागृती करित आहे. सरकारच्या या प्रयत्नांना हातभार लावून स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी, तसेच बेटी बचाओ अभियानाचा प्रचार करण्यासाठी कारंजा येथील एका ट्रॅक्टर व्यावसायिकाकडून दुकानाच्या बिलांचा वापर केला जात आहे.
देशात महिलांचे पुरूषांमागील दरहजारी प्रमाण कमी आहे. ब्रिटिश मेडिकल र्जनलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार १९८0 ते २0११ या दरम्यानच्या काळात भारतात १.२0 कोटी मुलींची गर्भातच हत्या करण्यात आल्याचे निरिक्षण नोंदविण्यात आले आहे. स्त्रीभ्रूण हत्येचे हे प्रमाण लक्षात घेता, राज्य सरकार आणि केंद्र सरकारमार्फत स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. एक सामाजिक बांधिलकी म्हणून ट्रॅक्टरचे सुटे पार्टस्, तसेच ट्रॅक्टर्सची विक्री करणार्या कारंजा येथील एका व्यावसायिकाने दुकानाच्या बिलावर स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचा संदेश मुद्रीत केला. या बिलाच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न ते गत दोन वर्षांपासून करीत आहेत.
ह्यखुडू नको कळी आई.. जगू दे गं मला, दिवा हवा वंशाचा पणती नको का गं तुलाह्ण अशी मार्मिक ओळ या व्यवसायिकाने बिलाच्या मागील बाजुला दिली आहे. ह्यभ्रूण हत्या एक ऐसा अपराध है, जिसका कोई प्रायश्चित्त नहीह्ण असाही संदेश या व्यवसायिकाने दिला आहे. ह्यया जगात कोणतीही मुलगी ही तिच्या पतीसाठी त्याची राणी नसेलही कदाचित; पण.. तिच्या वडिलांसाठी नेहमीच ती एक सुंदर परी असेलह्ण, एका पित्याला हेलावून टाकणार्या या हृदयस्पश्री ओळीही बिलाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न हा व्यवसायिक करीत आहे.