पातूर येथे काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवून केंद्र सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:14 IST2021-06-28T04:14:41+5:302021-06-28T04:14:41+5:30

पातूर : येथील जुने बसस्थानक परिसरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भात केंद्र शासनाचा निषेध करून विरोध व्यक्त केला. ...

Protest of Central Government by showing black flags on behalf of Congress at Pathur | पातूर येथे काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवून केंद्र सरकारचा निषेध

पातूर येथे काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवून केंद्र सरकारचा निषेध

पातूर : येथील जुने बसस्थानक परिसरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भात केंद्र शासनाचा निषेध करून विरोध व्यक्त केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी काळे झेंडे दाखविले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून अकोला जिल्हा अध्यक्ष पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पातुर तालुक्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाराम डाखोरे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी रमेश पाटील, भगत सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी अकोला, मोहम्मद रजा उल्‌ हक ऊर्फ बाबू भाई उपाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी अकोला, सलीम भाई जिल्हा संघटक, प्रीतम खुळे गुरुजी तालुका उपाध्यक्ष, अनिल राठोड, रवींद्र काळे, रवींद्र गोतरकर, तालुक्याचे महासचिव शेख मुख्तार, युवा अध्यक्ष चंदू बारतासे, ब्रम्हा काळे, रामदास लोखंडे यांच्यासह इतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

(फोटो)

===Photopath===

270621\img-20210627-wa0201.jpg

===Caption===

???? ?? ????? ?? ???????? ?? ?????? ???? ?????

Web Title: Protest of Central Government by showing black flags on behalf of Congress at Pathur