महानगर काँग्रेस अध्यक्ष यांच्याविरोधातील बंड शांत!

By Admin | Updated: July 26, 2016 02:01 IST2016-07-26T02:01:31+5:302016-07-26T02:01:31+5:30

प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा; निर्णय प्रक्रियेत विश्‍वासात घेण्याचे आश्‍वासन.

Protest against municipal Congress president calm! | महानगर काँग्रेस अध्यक्ष यांच्याविरोधातील बंड शांत!

महानगर काँग्रेस अध्यक्ष यांच्याविरोधातील बंड शांत!

अकोला: काँग्रेस प्रदेश कमिटीने २९ जून रोजी अकोला महानगर काँग्रेस अध्यक्षपदी माजी आमदार बबनराव चौधरी यांच्या नियुक्तीविरोधात बंड करणार्‍या पदाधिकार्‍यांची समजून काढण्यात पक्षङ्म्रेष्ठी यशस्वी झाले आहेत. चौधरी यांची नियुक्ती पक्षाने केली असून त्यांना पूर्ण सहकार्य करा, तुमचा योग्य तो सन्मान कार्यकारिणी गठित करताना ठेवला जाईल तसेच निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्येही विश्‍वासात घेतले जाईल, असे आश्‍वासन पक्षाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिल्यामुळे अकोला काँग्रेस महानगर अध्यक्षांच्या विरोधातील बंड शांत झाले आहे. चौधरी यांची नियुक्ती झाली त्याच दिवशी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन चौधरी यांच्या नियुक्तीला विरोध करीत ही नियुक्ती रद्द करण्यासाठी आंदोलनाचीही हाक दिली होती; मात्र याची पक्षङ्म्रेष्ठींनी वेळीच दखल घेत आंदोलन न करता चर्चेला येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार सोमवारी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या समवेत काँग्रेसचे पदाधिकारी चर्चा करण्यासाठी मुंबईला दाखल झाले होते. त्यामध्ये अकोला शहर काँग्रेस कमेटीचे महासचिव राजेश भारती, अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार उषा विरक, मनपाविरोधी पक्षनेता साजिदखान पठाण, अकोला जिल्हा काँग्रेस कमेटीचे महासचिव प्रकाश तायडे, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे महासचिव डॉ. झिशान हुसेन यांचा समावेश होता. या सर्व नेत्यांसोबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी चर्चा केली. पक्षात काम करताना प्रत्येकाला संधी मिळते त्यामुळे यावेळी बबनराव चौधरी यांना संधी दिली आहे. त्यांना सहकार्य करा, तुमच्या सर्व कार्यकर्त्यांसह तुमचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल, महापालिकेच्या तिकीट वाटपामध्ये विश्‍वासात घेतले जाईल, अशा शब्दात या ह्यबंडोबांह्ण ची समजूत काढली. काँग्रेस पक्षासमोर मोठे आव्हान आहे त्यामुळे मतभेद विसरून पक्षवाढीसाठी कामाला लागा, असे आवाहन चव्हाण यांनी केले. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी जातीने अकोल्यात लक्ष देईल, असा विश्‍वास दिल्याने या सर्व बंडोबांनी तलवारी म्यान करीत अकोल्याचा मार्ग धरला.

Web Title: Protest against municipal Congress president calm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.