पातुरात नारायण राणेंच्या अटकेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:24 IST2021-08-25T04:24:28+5:302021-08-25T04:24:28+5:30
महाराष्ट्रात हत्या आणि बलात्कारसारखे असे भयंकर गुन्हे असणाऱ्या आरोपींना राज्य सरकार अटक करत नाही; मात्र एका वक्तव्यावरून केंद्रीय ...

पातुरात नारायण राणेंच्या अटकेचा निषेध
महाराष्ट्रात हत्या आणि बलात्कारसारखे असे भयंकर गुन्हे असणाऱ्या आरोपींना राज्य सरकार अटक करत नाही; मात्र एका वक्तव्यावरून केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक केवळ राजकीय सूडापोटीच होत असल्याचा आरोप आंदोलनाच्यावेळी करण्यात आला. भाजपचा महाराष्ट्रातील वाढता जनाधार रोखण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही भाजपतर्फे करण्यात आला. यावेळी राज्य सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात भाजपचे रमण जैन, अनंत बगाडे, चंद्रकांत अंधारे, श्रीकांत बराटे, अभिजित गहिलोत, मंगेश केकन, कपिल खरप, विनेश चव्हाण, विश्वासराव देशमुख, सचिन बारोकार, सचिन बायस, गणेश गाडगे, राजेश आवटे, किरण निमकंडे, संजय उजाडे, सागर आखरे, गजानन गुजर, शशिकांत भरकर, विजय भगत, विष्णू शेलारकर, दिनेश करपे, नीलेश फुलारी, भारत फुलारी, दिनेश तायडे, संजय गोतरकर, अनिल खाडे, शिरू (श्रीकृष्ण) पाटील, निरज कुटे, विठ्ठल ताले, अर्जुन लसनकर, आशुतोष सपकाळ, सतीश इंगळे, किरण फुलारी, अमोल राठोड, मनोहर वगरे, गोपाल ठाकरे, हरिभाऊ चोपळे, शिवदास राठोड, गोपाल गोतरकर, पुरुषोत्तम गिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
240821\img-20210824-wa0298.jpg
आंदोलन