शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागितले प्रस्ताव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 13:58 IST

अकोला : जिल्हाधिकाºयांचा तहसील अकोला दुष्काळी परिस्थिती असलेल्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधी मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मागविण्यात आले आहेत.

- संतोष येलकरअकोला : जिल्हाधिकाºयांचा तहसील अकोलादुष्काळी परिस्थिती असलेल्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधी मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मागविण्यात आले आहेत. पीक नुकसानाचे क्षेत्र आणि दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी आवश्यक असलेल्या मदतीचे प्रस्ताव सोमवारपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी पाचही तहसीलदारांना दिला.यावर्षीच्या पावसाळ्यात पावसातील खंड, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर इत्यादी पाच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत खरीप पिकांचे नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. दुष्काळग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनामार्फत लवकरच मदत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी मदतनिधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात येणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकºयांच्या मदतीसाठी आवश्यक असलेल्या मदत निधी मागणीचे प्रस्ताव सोमवार, १९ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दुष्काळग्रस्त पाचही तालुक्यांच्या तहसीलदारांना दिला आहे.प्रस्तावात अशी मागितली माहिती!दुष्काळी परिस्थितीत पीकनिहाय नुकसानाचे क्षेत्र, दुष्काळग्रस्त शेतकरी आणि राष्ट्रीय आपत्ती मदत निधी (एनडीआरएफ) निकषानुसार दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी आवश्यक असलेला निधी इत्यादी प्रकारची माहिती मदत निधी मागणीच्या प्रस्तावात तहसीलदारांकडून मागविण्यात आली आहे.३.१७ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान!जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांत ३ लाख १७ हजार २८४ हेक्टरीवरील) खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यात ८६ हजार ६२३ हेक्टर, बार्शीटाकळी तालुक्यात ५१ हजार ५६२ हेक्टर, तेल्हारा तालुक्यात ५३ हजार ३६ हेक्टर, बाळापूर तालुक्यात ६० हेक्टर ५९१ हेक्टर व मूर्तिजापूर तालुक्यात ६५ हजार ४७२ हेक्टरवरील पीक नुकसानाचा समावेश आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोलाdroughtदुष्काळAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय