शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

पातूर तालुक्यातील शिर्ला सौर उर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 9:55 PM

शिर्ला (अकोला): पातूर तालुक्यातील वीज भारनियमनाचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविणार्‍या शिर्ला येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव १९ डिसेंबरच्या  दुपारी हिवाळी अधिवेशन काळात आमदार बळीराम सिरस्कार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला.

ठळक मुद्देआमदार बळीराम सिरस्कार यांचा पुढाकार२२ डिसेंबर रोजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनांत महत्त्वपूर्ण बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला (अकोला): पातूर तालुक्यातील वीज भारनियमनाचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविणार्‍या शिर्ला येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव १९ डिसेंबरच्या  दुपारी हिवाळी अधिवेशन काळात आमदार बळीराम सिरस्कार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. शिर्ला सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत कृतीशील आराखडा तयार करण्यासाठी  २२ डिसेंबर रोजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनांत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे अशी माहिती बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी प्रस्तूत वार्ताहराला दिली.पातूर तालुक्यातील विजेच्या तुडवड्यामुळे केवळ रात्रीच कृषी पंपाना वीज पूरवठा करण्यात येतो. त्यामुळे रात्री झोपेचा ताणामुळे शेतकर्‍यांवर  जीव अपघाताने गमावण्याची वेळ अनेकवेळा आली. त्याबरोबरच रात्रभर सिंचनासाठी घालवण्यासाठी वेळ गेल्याने दिवसा बाजारपेठेला जाणे शक्य होत नाही. परिणामी शेतकरी त्रस्त होते. उन्हाळ्यात  वीजेची मागणी पुर्ण होत नाही.परिणामी, गावातील छोटे-मोठे उद्योग प्रभावित होतात ,त्याबरोबरच घरातील उपकरणे बंद राहिल्याने गावकरी त्रस्त होतात.पारस औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र केवळ ४0 कि.मी. अंतरावर असूनही पातुर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विजेचा तुटवडा  जाणवत आहे. अशास्थितीत   शिर्ला येथील ४६ हेक्टरवरील  प्रस्तावित  सौर ऊर्जा प्रकल्प पातूर तालुक्यातील विजेचा तूडवडा दूर करू शकेल. त्याबरोबरच दहा हजारांहून अधिक कृषीपंपाना तथा गावांना दिवसभर अखंड वीजपुरवठा सुरळीत मिळू शकेल.त्याचे सकारात्मक दूरगामी परिणाम दिसून येतील असे आमदार बळीराम सिरस्कार यांनी सांगितले. सदर सौर ऊर्जा प्रकल्प तातडीने पाठपुरावा करून पुर्ण केला जाईल असेही त्यांनी दुरध्वनीवरून सांगितले.   सौर ऊजेर्चा वापर करून वीजेची गरज भागविणारा पातुर तालुक्यातील शिर्ला सौर ऊर्जा प्रकल्प पहिला ठरेल एवढे मात्र नक्की.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण