मांडणीचा वनग्रामासाठी प्रस्ताव

By Admin | Updated: September 2, 2014 23:12 IST2014-09-02T23:11:47+5:302014-09-02T23:12:28+5:30

खामगाव वनपरिक्षेत्रातील मांडणी येथे तिनशे हेक्टर क्षेत्रावर चराई, कुर्‍हाडबंदीची यशस्वी अंमलबजावणी.

Proposal for rebuilding the structure | मांडणीचा वनग्रामासाठी प्रस्ताव

मांडणीचा वनग्रामासाठी प्रस्ताव

खामगाव: हिरवळीची जोपासना करून वनक्षेत्र संवर्धनात अमरावती विभागात अग्रेसर असलेल्या मांडणीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अमरावती वनसंरक्षक कार्यालयाच्या निर्देशानुसार मांडणीचा वनग्रामासाठीचा प्रस्ताव नुकताच सादर करण्यात आल्याची माहिती आहे. अमरावती वन विभागाअंतर्गत असलेल्या बुलडाणा वन विभागातील नऊ वन व्यवस्थापन समित्यांना वनग्रामासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. खामगाव वन परिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या मांडणी वन व्यवस्थापन समितीने गेल्या वर्षभरात तिनशे हेक्टर क्षेत्रावर चराई आणि कुर्‍हाडबंदीची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे पूर्वी ओसाड पडलेल्या क्षेत्रावरही आता हिरवळ असून नैसर्गिक साधन संपत्ती वाढली आहे. हिरवळीचे क्षेत्र वाढविण्यासोबतच अवैध वृक्षतोड, वनक्षेत्रातील अतिक्रमण, वनवणवा, अवैध चराई आदी बाबींनाही मांडणी वन व्यवस्थापन समितीने प्रतिबंध घातला आहे.ह्यवृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरेह्ण या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रत्यय ठायीठायी मांडणी येथे येतो. शासकिय नियमांच्या अंमलबजावणी केल्यामुळे खामगाव तालुक्यातील लहानशा खेड्याचे नाव विभागात अव्वल आहे. बुलडाणा वन विभागाच्या वनक्षेत्राची ८४ हजार हेक्टर व्याप्ती असून या वन विभागाअंतर्गत दहा वन समित्यांची राज्य शासनाच्या राज्य स्तरीय तसेच जिल्हास्तरीय संत तुकाराम वनग्राम उत्कृष्ट संयुक्त वन व्यवस्थापन समिती पुरस्काराच्या प्रस्तावासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये खामगाव वन परिक्षेत्रातील मांडणी वन समितीची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी तर बुलडाणा वन परिक्षेत्रातील शेकापूर, जामठी, गंधारी(मेहकर), जनुना (घाटबोरी), सोनबंर्डी, रायपूर, निमखेडी (जळगाव जामोद), हनवतखेड(मोताळा) या गावांचा समावेश आहे. वनग्राम समित्यांच्या निवडीसाठी बुलडाणा वन विभागाच्यावतीने नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रानुसार चराईबंदी, कुर्‍हाडबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार्‍या मांडणी वन व्यवस्थापन समितीचा अहवाल सादर करण्यात आला असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी शिवाजी दहीवाल यांनी दिली.

Web Title: Proposal for rebuilding the structure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.