दोन उपायुक्तांसाठी शासनाकडे प्रस्ताव
By Admin | Updated: November 24, 2015 01:48 IST2015-11-24T01:48:46+5:302015-11-24T01:48:46+5:30
एकाकी किल्ला लढविण्याचा आयुक्तांचा प्रयत्न.

दोन उपायुक्तांसाठी शासनाकडे प्रस्ताव
अकोला: महापालिकेत वरिष्ठ अधिकार्यांची १८ पदे रिक्त आहेत. प्रामुख्याने उपायुक्त दर्जाची दोन, तर सहायक आयुक्तांच्या तीन पदांचा समावेश आहे. शहरातील विकासकामांसाठी शासनाकडून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला असला तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारीच नसल्याने विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यानुषंगाने महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी दोन उपायुक्तांच्या शिफारशींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याची माहिती आहे. महापालिकेत उपायुक्तांसह वरिष्ठ अधिकार्यांची पदे रिक्त असताना आयुक्त अजय लहाने प्रशासनाचा एकहाती कि ल्ला लढवत असल्याचे चित्र आहे. शहरातील प्रमुख सिमेंट रस्त्यांच्या रूंदीकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आयुक्तांनी अकोलेरांना मोठा दिलासा दिला. यादरम्यान, प्रशासकीय कामे करताना आयुक्तांच्या सोबतीला सक्षम अधिकार्यांची फळी नसल्याने आयुक्तांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.