जिल्ह्यातील पाणीपुरवठा याेजनांसाठी १७८ काेटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:19 IST2021-05-21T04:19:21+5:302021-05-21T04:19:21+5:30

अकाेला : जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर व अकाेला येथील चार पाणीपुरवठा याेजनांसाठी १७८ काेटी ७३ लक्षचा निधी उपलब्ध ...

Proposal of 178 girls for water supply schemes in the district | जिल्ह्यातील पाणीपुरवठा याेजनांसाठी १७८ काेटींचा प्रस्ताव

जिल्ह्यातील पाणीपुरवठा याेजनांसाठी १७८ काेटींचा प्रस्ताव

अकाेला : जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर व अकाेला येथील चार पाणीपुरवठा याेजनांसाठी १७८ काेटी ७३ लक्षचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव बुधवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सादर केला़

ग्रामीण भागातील नागरिकांना नेहमीच पाणीटंचाईच्या समस्येला सामाेरे जावे लागते. आजराेजी जिल्ह्यात खांबाेरा प्रादेशिक पाणीपुरवठा याेजना, ८४ खेडी व ६४ खेडी ग्रामीण पाणीपुरवठा याेजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जाताे. यामध्ये अनेकदा तांत्रिक त्रुटी निर्माण हाेऊन पाणीपुरवठा खंडित हाेताे. अशा याेजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी शासन दरबारी ठाेस प्रयत्न हाेत नसल्याने तसेच यासंदर्भात प्रशासकीय अनास्था दिसत असल्याने काही याेजना बंद पडल्याचे दिसून येते. परिणामी ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण हाेऊन ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळते. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील अशा प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेअंतर्गत असलेल्या याेजना तसेच नळ याेजनांच्या दुरुस्तीसाठी आमदार देशमुख यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे १७८ काेटींचा प्रस्ताव सादर केला.

चार याेजनांसाठी प्रस्ताव सादर

प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेंतर्गत व्याळा (१२ गावे) नवीन याेजनेसाठी ७५ काेटी रुपये, खारपाणपट्ट्यातील लाखपुरी (मूर्तिजापूर) (१७ गावे) नवीन याेजनेसाठी ४३ काेटी रुपये, देउळगाव-पास्टूल (पातूर) नळ याेजना दुरुस्तीसाठी ५ काेटी ७३ लक्ष तसेच अकाेला तालुक्यातील खांबाेरा नळ याेजना दुरुस्तीसाठी ५५ काेटींच्या प्रस्तावाचा समावेश आहे.

Web Title: Proposal of 178 girls for water supply schemes in the district