महापालिकेची मालमत्ता मोजणी ठरणार निर्थक

By Admin | Updated: December 16, 2015 02:06 IST2015-12-16T02:06:40+5:302015-12-16T02:06:40+5:30

मालमत्ता कराचे लक्ष्य जुनेच!

The property counting will be decided by Niphak | महापालिकेची मालमत्ता मोजणी ठरणार निर्थक

महापालिकेची मालमत्ता मोजणी ठरणार निर्थक

अकोला: महापालिकेतर्फे शहरातील मालमत्ता मोजणी करण्यात आली होती. या मोजणीचे दस्तऐवज तयार करण्यात आले असले तरी अद्याप ते संगणकीकृत न झाल्याने चालू आर्थिक वर्षात नवीन मोजणीनुसार मालमत्ता कर आकारणी करणे अशक्य होणार आहे. त्यामुळे मनपाला जुन्याच लक्ष्यांकानुसार कर वसूल करावा लागणार असून, त्यातून कोट्यवधी रुपयांचा फटका महापालिकेला बसू शकतो. महानगरपालिकेच्या हद्दीतील चार झोनमध्ये सध्या एक लाखापेक्षा अधिक मालमत्ताधारक आहेत. मनपाच्या लेखी मात्र ५0 हजार संपत्तींचीच नोंद आहे. नळ जोडणीधारकांची स्थितीही अशीच आहे. महापालिका कर विभागाकडे वर्तमान स्थितीत ३0 ते ३५ हजार नळ जोडणीधारक आहेत. प्रत्यक्षात मात्र एक लाखापेक्षा अधिक नळ जोडणीधारक आहेत. याचाच अर्थ शहरात ६0 ते ६५ हजार अवैध नळ जोडण्या आहेत. महापालिकेच्या कर विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार, मालमत्ता करापोटी वर्षाकाठी १२ कोटी रुपये व जलप्रदाय विभागाला सहा कोटी रुपयांचा कर मिळतो. ही स्थिती बघता, शहरातील मालमत्तांची नव्याने मोजणी करण्यात आली होती. मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी करून घेतलेल्या मालमत्ता मोजणीचे दस्तऐवज फाइलमध्ये बंद झालेत. नव्या मोजणीनुसार मालमत्ता कर आकारणीसाठी त्याची नोंद संगणकीकृत करणे आवश्यक होते. मालमत्ता मोजणीचे काम आठ ते दहा महिन्यांपासून सुरू असताना ही माहिती संगणकावर अपलोड करण्यात आली नाही. त्यामुळे मनपाला नवीन मालमत्ता मोजणीनुसार कर आकारणी करणे शक्य होणार नाही. मालमत्ता मोजणीची माहिती संगणकीकृत झाली असती, तर या आर्थिक वर्षात मनपाला ९0 कोटी रुपयांचा मालमत्ता कर मिळू शकला असता.

Web Title: The property counting will be decided by Niphak