शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 15:37 IST

किसनराव हुंडीवाले यांची सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सार्वजनिक न्यास नोेंदणी कार्यालयात अग्निरोधक यंत्राचे सिलिंडर डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली.

ठळक मुद्देअग्निरोधक यंत्राचे सिलिंडर डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.यामध्ये हुंडीवाले यांचे वकील अ‍ॅड. नितीन धूत यांनाही मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

अकोला :  महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक खडकी येथील रहिवासी किसनराव हुंडीवाले यांची सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सार्वजनिक न्यास नोेंदणी कार्यालयात (न्यायालयात)अग्निरोधक यंत्राचे सिलिंडर डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्रीराम गावंडे त्यांचा मुलगा विक्रम गावंडे याच्यासह नऊ जणांनी हे हत्याकांड घडविले. यामध्ये हुंडीवाले यांचे वकील अ‍ॅड. नितीन धुत यांनाही मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ कौलखेड या शैक्षणिक संस्थेंतर्गत स्वामी विवेकानंद इंग्लिश हायस्कूल कौलखेड आणि स्वामी विवेकानंद प्राथमिक मराठी शाळा तुकाराम चौक येथे कार्यान्वित आहे. या संस्थेतील सभासदांच्या निवड प्रक्रियेचा वाद २०१४ पासून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सुरू आहे. याच वादाच्या प्रकरणात सोमवारी दुपारी १२ वाजता किसनराव हुंडीवाले न्यास नोंदणी कार्यालयात त्यांचा मुलगा प्रवीण यांच्यासोबत उपस्थित असताना दुसºया गटातील विक्रम ऊर्फ छोटु श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सुरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे रा. खेतान नगर कौलखेड आणि सतीश तायडे, विशाल तायडे व साबीर रा. बार्शीटाकळी हे नऊ जण न्यास नोंदणी कार्यालयात आले आणि त्यांनी किसनराव हुंडीवाले यांच्यावर हल्ला चढविला. टेबल, खुर्ची आणि लाकडी काठ्यांनी त्यांना मारहाण करीत असतानाच विक्रम ऊर्फ छोटु गावंडे याने अग्निरोधक सिलिंडर काढून तीन वेळा त्यांच्या डोक्यावर हल्ला केल्याने हुंडीवाले रक्ताच्या थारोळ्यात पडले. यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

शैक्षणिक संस्थेतील वाद तसेच गावंडे यांची नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केल्याने किसनराव हुंडीवाले यांची हत्या करण्यात आल्याची तक्रार त्यांचा मुलगा प्रवीण हुंडीवाले यांनी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी विक्रम ऊर्फ छोटु श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सुरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे रा. खेतान नगर कौलखेड आणि सतीश तायडे, विशाल तायडे व साबीर या नऊ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, १४३,१४७,१४८,१४९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोलाMurderखूनKisanrao Hundiwale Murder Caseकिसनराव हुंडीवाले हत्याकांड