मूर्तिजापुरात कांदा फेकून केला निषेध

By Admin | Updated: June 2, 2017 19:33 IST2017-06-02T19:33:14+5:302017-06-02T19:33:14+5:30

जिल्ह्यात अनेक ठिकाणी कृत्रिम भाववाढ

Prohibition of throwing onion after statue | मूर्तिजापुरात कांदा फेकून केला निषेध

मूर्तिजापुरात कांदा फेकून केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : शेतकऱ्यांनी १ जूनपासून सुरू केलेल्या संपाचा प्रभाव जाण्यास जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी सुरूवात झाली. मूर्तिजापूर येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा फेकुन निषेध व्यक्त केला. तसेच शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. बाळापूर तालुक्यात संपाचा फारसा परिणाम जाणवला नसला तरी काहींनी भाजीपाल्याचे कृत्रिम भाववाढ केली. तेल्हारा,अकोट,पातूर आणि बार्शीटाकळी तालुक्यात संपाचा फारसा परिणाम जाणवला नाही.

Web Title: Prohibition of throwing onion after statue