मूर्तिजापुरात साडेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:21 IST2021-03-09T04:21:22+5:302021-03-09T04:21:22+5:30

याप्रकरणी आरोपी विशाल घोरसडे याला ताब्यात घेतले असून विशाल घोरसडे याने मूर्तिजापूरच्या एमआयडीसीतील नवघरे यांच्या गोडाऊनमध्ये प्रतिबंधित गुटखा ...

Prohibited gutka worth Rs 3.5 lakh seized in Murtijapur | मूर्तिजापुरात साडेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

मूर्तिजापुरात साडेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

याप्रकरणी आरोपी विशाल घोरसडे याला ताब्यात घेतले असून विशाल घोरसडे याने मूर्तिजापूरच्या एमआयडीसीतील नवघरे यांच्या गोडाऊनमध्ये प्रतिबंधित गुटखा विक्रीकरिता आणून ठेवल्याची गोपनीय माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळताच विलास पाटील यांना मिळाली. त्यांनी पथकासह सकाळी ११.४० वाजता छापा घातला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या आरोपी विशालला विचारणा केली असता, त्याने, उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर कुलूप उघडून गोडाऊनमधून ११ पांढऱ्या पोत्यांमध्ये भरून ठेवलेला ३ लाख ५३ हजार ४०० रूपये किंमतीचा महाराष्ट्र प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू जप्त केला व आरोपीला ताब्यात घेतले. येथील स्टेशन विभागातील गुरुद्वारा रस्त्यावर राहणारा आरोपी विशाल राजेश घोरसडे (२२) याच्याविरूद्ध भादंवि कलम १८८, २७२ व २७३ तसेच अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ नुसार गुन्हा दाखल केला.

फोटो:

Web Title: Prohibited gutka worth Rs 3.5 lakh seized in Murtijapur