‘पणन’ने केली ४७ लाख विक्रमी कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 17:19 IST2020-02-29T17:19:02+5:302020-02-29T17:19:07+5:30
पणनच्या कापूस खरेदी केंद्रावर खरेदीसाठी शेकडो ट्रॅक्टर कापूस उभे आहेत.

‘पणन’ने केली ४७ लाख विक्रमी कापूस खरेदी
अकोला : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने यावर्षी आतापर्यंत ४७ लाख क्ंिवटल विक्रमी कापूस खरेदी केला असून, कोरोना व्हायरसचा परिणाम भारतीय कापूस बाजारावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने भाविष्यात दर वाढतील की नाही, या अनिश्चिततेमुळे बाजारात कापसाची आवक वाढली आहे. पणनच्या कापूस खरेदी केंद्रावर खरेदीसाठी शेकडो ट्रॅक्टर कापूस उभे आहेत.
पणन महासंघाने आतापर्यंत विदर्भात १५ लाख तर उर्वरित राज्यात ३२ लाख क्ंिवटल कापसाची खरेदी केली आहे. हमीदर बऱ्यापैकी असून, बाजारातही सरासरी प्रतिक्ंिवटल ५,३५० रुपये दर आहेत. कोरोना व्हायरसमुळे चीनला होणारी कापसाची निर्यात थांबली आहे. त्यामुळे भविष्यात दर वाढतील की नाही, ही अनिश्चितता असल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला काढला आहे. ‘पणन’च्या अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी या एकाच खरेदी केंद्रावर दररोज ३ हजार क्विंटल कापसाची आवक सुरू आहे. शेतकºयांनी गतवर्षी साठवून ठेवलेला कापूसदेखील विक्रीला काढला आहे. खरेदी यंत्रणा अपुरी पडत असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील आणि खरेदी केंद्रावर ३०० च्यावर ट्रॅक्टर कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. लेहगाव, अमरावती केंद्रावर २०० ट्रॅक्टरसह राज्यातील इतरही खरेदी केंद्रांवर ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या आहेत.
यावर्षी पणन महासंघाकडे कापूस विकण्यासाठी शेतकºयांचा कल वाढला आहे. गत पाच वर्षांत ही विक्रमी कापूस खरेदी करण्यात आली आहे. शेतकºयांनी गतवर्षी साठवून ठेवलेला कापूस विक्रीला काढला आहे. काही खरेदी केंद्रावर यावर्षीचा कापूस आता हलक्या प्रतीचा येत असल्याचे पणनच्या अधिकाºयांनी सांगितले.
यावर्षी आतापर्यंत ४७ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला असून, आणखी आवक सुरू आहे. काही खरेदी केंद्रावर ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या आहेत. खरेदी मात्र जोरात सुरू आहे.
- अनंतराव देशमुख,
अध्यक्ष,
म. रा. सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ.