उमरवाडी येथे पाणीटंचाईची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:47 IST2021-01-13T04:47:17+5:302021-01-13T04:47:17+5:30

---------------------------------- चोंढी येथील बाजारात घाणीचे साम्राज्य चोंढी : येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. गावात नाल्यांची दुरवस्था झाल्याने सांडपाणी ...

Problem of water scarcity at Umarwadi | उमरवाडी येथे पाणीटंचाईची समस्या

उमरवाडी येथे पाणीटंचाईची समस्या

----------------------------------

चोंढी येथील बाजारात घाणीचे साम्राज्य

चोंढी : येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. गावात नाल्यांची दुरवस्था झाल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे येथील बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

----------------------------------

पातूर येथील स्वच्छतागृहाला कुलूप

पातूर : शहरात स्वच्छतागृहांची संख्या कमी असल्याने प्रवाशांसह महिलांची कुचंबणा होत आहे. दरम्यान, येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाला नेहमीच कुलूप असते. पातूर शहरात ग्रामीण भागातून प्रवासी मोठ्या संख्येने येतात. स्वच्छतागृहाचा अभाव असल्याने महिलांची गैरसोय होत आहे.

--------------------------------

पातूर-मेडशी मार्गावर झाडांची कत्तल

पातूर : पातूर-मेडशी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी मार्गाच्या दुतर्फा असलेल्या हिरव्या झाडांची कत्तल केली जात आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

-----------------------

बीएसएनएलची सेवा विस्कळीत; ग्राहक त्रस्त

पातूर : शहरात रस्त्याचे काम सुरू असल्याने सोमवारी कामादरम्यान, बीएसएनएलचे केबल तुटल्याने शहरातील बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे शहरातील बँका व शासकीय कार्यालयांतील कामे ठप्प पडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

---------------------------------------

दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी

पातूर : महावितरणचे नियोजन कोलमडल्याने कृषीपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या सुमारास जीव धोक्यात घालून पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यामुळे कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

------------------------------

खापरखेड-भांबेरी रस्त्याची दयनीय अवस्था

भांबेरी : खापरखेड-भांबेरी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

--------------------------

भांबेरी सर्कल प्रमुखपदी विजय अंबेरे

भांबेरी : तेल्हारा येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार यांनी तेल्हारा तालुका भांबेरी पंचायत समिती सर्कल प्रमुखपदी विजय अंबेरे यांची नियुक्ती केली. (फोटो)

Web Title: Problem of water scarcity at Umarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.