तेल्हारावासीयांनी मुख्याधिकार्‍यांसमोर वाचला समस्यांचा पाढा

By Admin | Updated: June 25, 2014 01:42 IST2014-06-23T22:44:22+5:302014-06-25T01:42:26+5:30

तेल्हारा शहरातील नागरिक शहरातील विविध समस्यांमुळे त्रस्त.

The problem is read by Telhara residents before the Chiefs | तेल्हारावासीयांनी मुख्याधिकार्‍यांसमोर वाचला समस्यांचा पाढा

तेल्हारावासीयांनी मुख्याधिकार्‍यांसमोर वाचला समस्यांचा पाढा

तेल्हारा : स्थानिक नगरपालिका प्रशासनाचा कारभार पार ढेपाळला असून, शहरातील नागरिकांना याचा त्रास सोसावा लागत आहे. शहरातील याच समस्यांमुळे त्रस्त झालेल्या माऊली चौक येथील युवकांनी न. प. मुख्याधिकार्‍यांची भेट घेऊन शहरातील समस्यांचा पाढा वाचला. शहरातील प्रभाग क्र. २ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद असून, प्रभागातील नाल्या तुडुंब भरल्या आहेत. या प्रभागात रस्ते चांगले नसल्याने नागरिकांना मोठा त्रास होत आहे. कचरा जमा करण्याची जबाबदारी असलेली घंटागाडी अनेक दिवसांपासून फिरकलीच नसल्याने या भागात कचर्‍याचे ढीग जागोजागी पडून आहेत तर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पुरेसा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या सर्व समस्यांमुळे कंटाळलेल्या माऊली चौक येथील युवकांनी मुख्याधिकारी कृष्णा निपाणे यांची भेट घेऊन या समस्या त्वरित सोडवण्याची मागणी केली. समस्या त्वरित न सुटल्यास आंदोलनाचा इशारा युवकांनी मुख्याधिकार्‍यांना दिला. 

Web Title: The problem is read by Telhara residents before the Chiefs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.