‘आत्मा’ची नोकरभरती करणार खाजगी संस्था!
By Admin | Updated: May 6, 2015 00:58 IST2015-05-06T00:58:02+5:302015-05-06T00:58:02+5:30
राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचा-यांवर अन्याय.

‘आत्मा’ची नोकरभरती करणार खाजगी संस्था!
अकोला : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेत (आत्मा) काम करणार्या कंत्राटी कर्मचार्यांची नोकरभरती आता खासगी संस्थाद्वारे करण्यात येणार असल्याचे संकेत असल्याने सध्या आत्मा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हे नवे संकट असल्याचे वाटत असल्याने या कर्मचार्यांनी संघटनेच्या माध्यमातून या आदेशाच्या विरोधात आवाज उठविण्याचे ठरवले आहे. राष्ट्रीय कृषी धोरणामध्ये कृषी विस्तारातील क्रांतिकारी बदलांची गरज प्रामुख्याने समोर आल्याने कृषी विभागाच्या ह्यआत्माह्ण यंत्रणेला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या माध्यमातून आत्मा यंत्रणेमार्फत शासनाच्या विविध योजना शेतकर्यांपर्यंत पोहचविण्यात यश आले आहे. शेतकरी गट, नावीन्यपूर्ण प्रात्यक्षिके, शेतकरी प्रशिक्षण, शेतीशाळा, शेतीपूरक व्यवसाय, कृषी प्रदर्शन, धान्य महोत्सव, थेट शेतमाल विक्री याचा शेतकर्यांना चांगला फायदा होत आहे. यासाठी या महाराष्ट्रात आजमितीस एक हजारांवर कंत्राटी कर्मचारी हे काम करीत आहेत. आजवर या कर्मचार्यांची नियुक्ती कृषी विभागानेच केली आहे, पण आता या नियुक्त्या बाह्य स्रोताद्वारे करण्याचा निर्णय शासनाच्या कृषी विभागाने घेतला आहे. यामध्ये विभागीय कृषी सहसंचालक स्तरापर्यंतच्या कंत्राटी नियुक्त्या विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर एकत्रित मागणी घेऊन त्यानुसार यापुढे कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याऐवजी बाहय़स्रोताद्वारे करण्यात याव्यात आणि बाहय़ स्रोताद्वारे नियुक्ती करताना अनुसूचित जाती, जमाती अधिनियमातील तरतुदीनुसार बिंदुनामावली तयार करू न त्यानुसार कार्यवाही करावी, असा आदेश ९ एप्रिल रोजी कृषी, पशुसंर्वधन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाच्या अवर सचिवांनी काढला. त्यामुळे आत्माच्या कंत्राटी कर्मचार्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. या यंत्रणेत काम करणार्या हजारो कंत्राटी कर्मचार्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.