शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

खासगी रुग्णालयाचे शासनमान्य दरपत्रक ठरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 6:14 PM

खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी दरपत्रक बंधनकारक करण्यात आलेले आहे.

अकोला : खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी दरपत्रक बंधनकारक करण्यात आलेले आहे. सर्वाेपचार रुग्णालयावर अकोल्यासह शेजारच्या जिल्ह्यांचाही ताण आला असल्याने सर्वोपचारमध्ये उपचारासाठी जाण्यास रुग्णांमध्ये धास्ती असली तरी सर्वसमान्यांना सर्वोपचारचाच पर्याय बरा वाटेल असे दर खासगी रुग्णालयांचे आहेत.राज्य शासनाच्या २२ मे २०१८ च्या अधिसूचनेनुसार खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी दरपत्रक बंधनकारक करण्यात आलेले आहे. खासगी रुग्णालयात एका दिवसाचा दर ठरविण्यात आलेला आहे. यात रुग्णांची नियमित देखभाल, रक्त व लघवी तपासणी, सोनोग्राफी, 2-डी इको, एक्स-रे, ईसीजी तसेच मर्यादित किरकोळ औषधे, डॉक्टर्स तपासणी, रुग्ण तपासणी चार्जेस, नर्सिंग चार्जेस, जेवण, छोटे उपचार, नाकातून नळी टाकणे तसेच लघवीसाठी नळी टाकणे आदींचा समावेश आहे. रुग्णालयांनी नियमाप्रमाणे दर आकारणी न केल्यास, रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यास, बिलाची अवाजवी आकारणी केल्यास व इतर मदतीसाठी वैद्यकीय महाविद्यालय किंवा जिल्हा प्रशासनाची संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. असा आहे एका दिवसाचा दरजनरल वॉर्ड विलगीकरण कक्ष रु. ४,०००आयसीयू व्हेंटिलेटरशिवाय विलगीकरण कक्ष रु. ७,५००आयसीयू व्हेंटिलेटर विलगीकरण कक्ष रु. ९,०००१पीपीई किट, सेंटर लाइन टाकणे, श्वसन नलिका किंवा अन्ननलिकेत दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया, कोणत्याही अवयवाचा तुकडा तपासणी पाठवणे, छातीतील किंवा पोटातील पाणी काढणे हे दि. ३१ डिसेंबर २०१९ च्या दरपत्रकाप्रमाणे रुग्णालय आकारू शकतात.२तपासणी शासकीय केंद्रांमध्ये मोफत तर खासगी प्रयोगशाळेद्वारे केल्यास शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे दर आकारणी करावी लागेल.३औषधे, ईमिन्युग्लोबिन, मेरोपेनम, शिराद्वारे दिली जाणारी पोषक औषधे, टोसिलीझुमॅब इत्यादी दर छापील किंमतप्रमाणे असेल.४सिटी स्कॅन, एमआरआय तसेच इतर समाविष्ट नसलेले सर्व स्कॅन व प्रयोगशाळा तपासण्यांचे दर आकारणी ३० डिसेंबर २०१९ च्या दर पत्रकाप्रमाणे रुग्णालय आकारू शकतात. याचा एका दिवसाच्या दरामध्ये समाविष्ट नाही.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल