वरली अड्डय़ावर छापा; सात ताब्यात

By Admin | Updated: April 9, 2017 01:30 IST2017-04-09T01:30:55+5:302017-04-09T01:30:55+5:30

वरली अड्डय़ावर सिव्हिल लाइन पोलिसांनी छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले.

Printed at Worli Airport; Seven possession | वरली अड्डय़ावर छापा; सात ताब्यात

वरली अड्डय़ावर छापा; सात ताब्यात

अकोला : आंबेडकर नगरमध्ये सुरू असलेल्या वरली अड्डय़ावर सिव्हिल लाइन पोलिसांनी छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली असून, पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे.
आंबेडकर नगरातील रहिवासी आशिष वाकुळकर याच्या घराजवळ वरली अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा मारून आशिष वाकुळकर, अशोक बोदडे, दादाराव इंगळे, रवी विश्‍वकर्मा, सचिन हिरोळे, नीलेश नाईक आणि गौतम चक्रनारायण या सात जणांना वरली चालविताना रंगेहात अटक करण्यात आली. या सात जणांकडून वरली चिठ्ठय़ा आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध मुंबई जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Printed at Worli Airport; Seven possession