आलिशान फ्लॅटमधील वरली अड्डय़ावर छापा

By Admin | Updated: September 21, 2014 01:50 IST2014-09-21T01:50:47+5:302014-09-21T01:50:47+5:30

अकोल्यातील वरली अड्डय़ावर थाड, ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Print on the top of the flat in the luxury flat | आलिशान फ्लॅटमधील वरली अड्डय़ावर छापा

आलिशान फ्लॅटमधील वरली अड्डय़ावर छापा

अकोला - जैन लॉन्सजवळ असलेल्या पवनपुत्र अपार्टमेंटमधील चौथ्या माळयावरील आलिशान फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वरली अड्डय़ावर रामदासपेठ पोलिसांनी शनिवारी दुपारी छापा मारला. या ठिकाणावरून सात जणांना अटक करण्यात आली .
पवनपुत्र अपार्टमेंटमधील चौथ्या माळय़ावर जितेंद्र रमेशचंद्र गणात्रा यांच्या फ्लॅटमध्ये वरली अड्डा सुरू असल्याची माहिती रामदासपेठ पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर रामदासपेठ पोलिसांनी छापा मारून जितेंद्र रमेशचंद्र गणात्रा, संजय ओंकार धुमोने, शंकर आत्माराम काकड, रवि सूरजबली यादव, घनश्याम पुंडलिक भाकरे आणि अय्यूब खान युसूफ खान यांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून वरली चिठ्ठय़ा, ७ हजार ४७0 रुपये रोख, ८ मोबाइल पेन, कॅल्क्युलेटर अशाप्रकारे एकूण ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Web Title: Print on the top of the flat in the luxury flat