जुगार अड्डय़ावर छापा

By Admin | Updated: March 13, 2017 02:38 IST2017-03-13T02:38:12+5:302017-03-13T02:38:12+5:30

सहा जण ताब्यात, मुद्देमालासह रोख जप्त.

Print on gambling band | जुगार अड्डय़ावर छापा

जुगार अड्डय़ावर छापा

अकोला, दि. १२- अकोट फैलमध्ये सुरू असलेल्या बड्या जुगारींच्या जुगारावर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाने रविवारी सायंकाळी छापा टाकला. यावेळी एका सट्टा माफियासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अकोट फैलमधील शंकर नगरमध्ये सुरू असलेल्या जुगाराची गोपनीय माहिती विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळासपुरे यांना मिळाली. यावरून त्यांनी सदर ठिकाणावर छापा टाकून अकोट फैलातील शंकर नगर येथील रहिवासी विश्‍वनाथ खंडारे, जयेश एकनाथ सोनोने, मनोज ताराजन काळे, आशिष श्यामलाल बुंदेले, स्वप्निल मधुकर सावंग, गणेश भिकाजी पाकदुने, या सहा जणांना ताब्यात घेतले. या सहा जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रोख रकमेसह पाच मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. तब्बल १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी केली.

Web Title: Print on gambling band