संत्रा व लिंबू या फळपिकांकरिता प्रधानमंत्री पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 03:04 PM2019-06-04T15:04:43+5:302019-06-04T15:04:51+5:30

अकोला: जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०१९ मध्ये मृग बहाराकरिता संत्रा व लिंबू या फळपिकांना लागू करण्याबाबत शासनकडून मान्यता मिळाली आहे.

Prime Minister's Crop Insurance for Orange and Lemon Fruit | संत्रा व लिंबू या फळपिकांकरिता प्रधानमंत्री पीक विमा

संत्रा व लिंबू या फळपिकांकरिता प्रधानमंत्री पीक विमा

Next

अकोला: जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०१९ मध्ये मृग बहाराकरिता संत्रा व लिंबू या फळपिकांना लागू करण्याबाबत शासनकडून मान्यता मिळाली आहे.
संत्रा या फळपिकाकरिता अकोट तालुक्यातील महसूल मंडळ अकोट, उमरा, पणज, अकोलखेड, तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु. व हिवरखेड महसूल मंडळ, पातूर तालुक्यातील पातूर महसूल मंडळ, बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा महसूल मंडळ, मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम, हातगाव व निंभा या महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच लिंबू या फळपिकाकरिता बाळापूर तालुक्यातील वाडेगाव महसूल मंडळ, बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा, धाबा महान व खेर्डा महसूल मंडळ, अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, शिवण, सांगळूद, कापशी व कौलखेड या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्यात संत्रा या फळपिकाकरिता विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी रु. ७७ हजार व लिंबू या फळपिकाकरिता विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी रु. ६६ हजार आहे. एकूण विमा हप्ता प्रति हेक्टरी संत्र्याकरिता रु.२१,५६० व लिंबूकरिता रु. १७,४९० आहे. संत्रा फळपिकाकरिता केंद्र व राज्य शासनाचे अनुदान प्रत्येकी रु. ७०९५ आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता संत्र्याकरिता प्रति हेक्टरी रु. ३,८५० असून लिंबूकरिता प्रति हेक्टरी रु. ३,३०० आहे. सदर योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम तारीख १४ जून २०१९ आहे. अंतिम मुदतीची वाट न पाहता जास्तीत जास्त शेतकºयांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण वाघमारे यांनी केले आहे.

 

Web Title: Prime Minister's Crop Insurance for Orange and Lemon Fruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.