पोलिस असल्याची बतावणी; दोघांना लुटले

By Admin | Updated: July 6, 2014 00:41 IST2014-07-06T00:36:33+5:302014-07-06T00:41:26+5:30

दोघा आरोपींनी पोलिस असल्याची बतावणी करून युवक व युवतीस लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

Pretending to be a policeman; Looted both | पोलिस असल्याची बतावणी; दोघांना लुटले

पोलिस असल्याची बतावणी; दोघांना लुटले

अकोला: दोघा आरोपींनी पोलिस असल्याची बतावणी करून युवक व युवतीस लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी आकोट फैल पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ८ जुलैपर्यंंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
कावसा येथे राहणारी वैशाली प्रकाश तेलगोटे (२३) ही तिच्या मित्रासोबत मोटारसायकलने घुसर शेतशिवाराकडे जात असताना, आरोपी म्हातोडीचे उमेश सोनटक्के व भीमलाल मोतीराम सिरसाट यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना घुसर रोडवर अडविले आणि पोलिस असल्याची बतावणी करून त्यांच्याजवळून जबरदस्तीने दोन मोबाईल व ९५0 रोख हिसकावून घेतले, असा एकूण २९५0 रुपयांचा मुद्देमाल घेऊन हे दोघे पसार झाले. युवतीच्या तक्रारीनुसार, आकोट फैल पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा मोबाईलच्या आधारे शोध घेतला. पोलिसांनी दोघाही आरोपींना म्हातोडी गावातून अटक केली.

Web Title: Pretending to be a policeman; Looted both