शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

शिक्षकांवर दबाव; शाळा व्यवस्थापन समितीला झुकते माप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:35 PM

अकोला : शाळा व्यवस्थापन समितीच्या जाचाला कंटाळलेल्या मनपा उर्दू शाळा क्रमांक नऊमधील सर्व चौदा शिक्षकांनी आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे तक्रार केली.

ठळक मुद्देव्यवस्थापन समिती व काही नगरसेवकांनी संगनमताने शाळेतील शिक्षकांवर दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. शिक्षकांच्या शैक्षणिक कामात हस्तक्षेप करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाचे सर्व नियम, निकष बाजूला सारून शिक्षकांवर मनमानी कारभार करण्यासाठी दमदाटी केली जात आहे.

अकोला : शाळा व्यवस्थापन समितीच्या जाचाला कंटाळलेल्या मनपा उर्दू शाळा क्रमांक नऊमधील सर्व चौदा शिक्षकांनी आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त वाघ यांनी याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांना दिला होता. चौकशीदरम्यान चक्क शिक्षकांवरच दबावतंत्राचा वापर करण्यात आला असून, शाळा व्यवस्थापन समितीला झुकते माप देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याप्रकरणी आयुक्त जितेंद्र वाघ यांनी जातीने लक्ष देऊन ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.खदान परिसरातील उर्दू मुलांची शाळा क्रमांक नऊमध्ये शाळा व्यवस्थापन समिती व काही नगरसेवकांनी संगनमताने शाळेतील शिक्षकांवर दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शाळेत दररोज येऊन शिक्षकांच्या शैक्षणिक कामात हस्तक्षेप करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाचे सर्व नियम, निकष बाजूला सारून शिक्षकांवर मनमानी कारभार करण्यासाठी दमदाटी केली जात आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या निर्देशानुसार कामकाज न केल्यास शिक्षकांना त्यांची बदली करण्याचे धमकीवजा इशारे दिले जात असल्यामुळे या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या शाळेतील सर्व १४ शिक्षकांनी शाळेमध्ये सेवा न देण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या कारभाराला वैतागलेल्या शिक्षकांनी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे धाव घेऊन तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त वाघ यांनी शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. चौकशीदरम्यान शाळेतील सर्व शिक्षकांवर अप्रत्यक्ष दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे.शाळेचा मनमानी वापर करण्यासाठी खटाटोपउन्हाळ्याच्या दिवसांत उर्दू शाळा क्रमांक नऊमध्ये परिसरातील असंख्य नागरिक लग्नकार्य साजरे करतात. या बदल्यात मनपाच्या नावाखाली शाळा व्यवस्थापन समितीकडून अतिरिक्त शुल्क वसूल केल्या जात असल्याची माहिती आहे. शाळेची इमारत व परिसराचा मनमानीरीत्या वापर करून त्या बदल्यात आर्थिक कमाई करण्याच्या उद्देशातूनच प्रामाणिक शिक्षकांसोबत नाहक वाद निर्माण करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणाची आयुक्तांनी गंभीर दखल घेण्याची अपेक्षा आहे.

शिक्षणाधिकारी पुन्हा रजेवर!मनपाच्या शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी मनपात प्रदीर्घ रजेनंतर पाऊल ठेवले होते. त्यावेळी उर्दू शिक्षकांच्या प्रकरणात आयुक्त जितेंद्र वाघ यांनी चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यापूर्वीच शिक्षणाधिकारी सुलताना यांनी उर्दू शाळेत जाऊन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी थातूरमातूर चौकशी अहवाल तयार केला, त्यानंतर पुन्हा शिक्षणाधिकारी रजेवर गेल्या आहेत. असे असले, तरी उर्दू शाळा क्र. नऊमधील काही शिक्षकांवर तक्रार मागे घेऊन प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी शिक्षण विभागाकडून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाSchoolशाळाTeacherशिक्षक