पोलीस कर्मचारी गंगाधर चौधरी यांना राष्ट्रपती पदक जाहीर
By Admin | Updated: August 15, 2016 02:54 IST2016-08-15T02:41:26+5:302016-08-15T02:54:30+5:30
अकोला पोलीस दलातील पोलीस कर्मचा-याचा सन्मान.

पोलीस कर्मचारी गंगाधर चौधरी यांना राष्ट्रपती पदक जाहीर
अकोला, दि. १४: अकोला पोलीस दलातील पोलीस कर्मचारी तथा डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले गंगाधर पंडित चौधरी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. गंगाधर चौधरी हे अकोला जिल्हा पोलीस दलात १९८७ मध्ये सेवेत रुजू झाले होते. त्यानंतर २00३ मध्ये त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले होते. त्यानंतर गंगाधर चौधरी यांनी पोलीस दलात सिटी कोतवाली, रामदासपेठ, मूर्तिजापूर, स्थानिक गुन्हे शाखेत आणि महामार्ग सुरक्षा पथकात व लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात यशस्वी कामगिरी बजावली आहे. सध्या चौधरी डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत.