पत्रकारितेची मूल्ये जपणे हेच बाळशास्त्रींना खरे अभिवादन- बेलाडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:28 IST2021-02-23T04:28:16+5:302021-02-23T04:28:16+5:30

पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने आयोजित आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती समारोहात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश ...

Preserving the values of journalism is the true salutation to pediatricians - Beladkar | पत्रकारितेची मूल्ये जपणे हेच बाळशास्त्रींना खरे अभिवादन- बेलाडकर

पत्रकारितेची मूल्ये जपणे हेच बाळशास्त्रींना खरे अभिवादन- बेलाडकर

पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने आयोजित आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती समारोहात ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव रविकुमार राठी यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रा. दीपक जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष निझाम इंजिनियर, नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष विलास वानखडे, धामोरीचे उपसरपंच विजय चतुरकार उपस्थित होते.

शनिवारी बाळशास्त्रींना त्यांच्या जयंतीनिमित्त शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये व अन्यत्र अभिवादन करण्याचे राज्य शासनाचे आदेश निर्गमित झाले असून, तो संदर्भ घेऊन हा कार्यक्रम आयोजित केल्याचे पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब गणोरकर यांनी प्रास्ताविकातून नमूद केले. तसेच विलास वानखडे यांना मुंबईच्या प्रतिष्ठित संस्थेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. रविकुमार राठी, प्रा. दीपक जोशी, निझाम इंजिनियर यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन गोपाल ठक यांनी केले, तर अजय प्रभे यांनी आभार मानले. (फोटो)

Web Title: Preserving the values of journalism is the true salutation to pediatricians - Beladkar