सट्टाप्रकरणी आजी-माजी नगराध्यक्षपुत्रांना अटक
By Admin | Updated: March 21, 2016 01:51 IST2016-03-21T01:51:37+5:302016-03-21T01:51:37+5:30
मंगरुळपीरात क्रिकेटवर सट्टा : सात आरोपी ताब्यात

सट्टाप्रकरणी आजी-माजी नगराध्यक्षपुत्रांना अटक
मंगरुळपीर : भारत-पाकिस्तान टष्द्वेंटी-२0 क्रिकेट सामन्यावर पैशांच्या हार-जितीचा डाव खेळणार्या नगराध्यक्षपुत्रासह सात आरोपींना २५ मोबाइल, लॅपटॉप, जवळपास अडीच लाखांच्या साहित्यासह मंगरुळपीर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगरुळपीर पोलिसांनी १९ मार्चच्या रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास संभाजीनगर भागात केली.
शनिवारच्या रात्रीदरम्यान स्थानिक संभाजीनगर भागात भारत-पाकिस्तान टष्द्वेंटी-२0 क्रिकेट सामन्यावर पैशाच्या ह्यहार-जितह्णचा डाव खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मंगरुळपीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय भेंडे, पोलीस उपनिरीक्षक नारायण पांचाळ, विजय जाधव, राहुल जयसिंगकर यांच्या पथकाने घटनास्थळावर छापा मारून आरोपींना रंगेहात पकडले. यामध्ये मंगरुळपीरचे नगराध्यक्ष प्रकाश परळीकर यांचा मुलगा विजय प्रकाश परळीकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अशोक परळीकर यांचा मुलगा मयूर अशोक परळीकर, शैलेश शेखर परळीकर, मोहित अरुण परळीकर, नटवर ईश्वर बाबरे, विवेक ङ्म्रीराम चव्हाण, रोहन सुनील परळीकर या आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली.
आरोपींजवळ दोन एलसीडी टीव्ही, प्रोजेक्टर, दोन लॅपटॉप, २५ मोबाइल, एक रेकॉर्डर व रोख रक्कम असा जवळपास २ लाख ४१ हजार ६४0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४/५ जुगार अँक्ट ६६ तसेच माहिती-तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
आरोपींमध्ये मंगरुळपीरचे विद्यमान नगराध्यक्षाचा मुलगा व माजी नगराध्यक्षाच्या मुलाचा समावेश आहे. वरली व सट्टेबाजी आटोक्यात आणण्यासाठी मंगरुळपीर पोलिसांनी प्रथमच ह्यप्रभावशालीह्ण आरोपींना अटक करून धडक कारवाईचे सुतोवाच केले. यामुळे शहरातील वरलीबहाद्दर व सटोडियांचे धाबे दणाणले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय बेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.