प्रशांत देशमुख अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:33 IST2021-03-04T04:33:23+5:302021-03-04T04:33:23+5:30

भारतातील येणारे कॅन्सर रोग ग्रस्तांना संत गाडगे महाराज संस्थेच्या माध्यमातून राहण्याची, जेवण्याची व औषधाचीसुद्धा सोयी केली जाते. संत गाडगे ...

Prashant Deshmukh Ahilyabai Holkar honored with National Award | प्रशांत देशमुख अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

प्रशांत देशमुख अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

भारतातील येणारे कॅन्सर रोग ग्रस्तांना संत गाडगे महाराज संस्थेच्या माध्यमातून राहण्याची, जेवण्याची व औषधाचीसुद्धा सोयी केली जाते. संत गाडगे महाराज यांच्या विचाराने प्रेरित असलेले प्रशांत देशमुख स्वच्छता अभियानच्या माध्यमातून संपूर्ण जगात फिरून व्यसनमुक्तीचा संदेश देत आहेत. गाडगेबाबांच्या कार्यात स्वतःसह कुटुंबाला झोकून देत, कर्करोगग्रस्त रुग्णांना मुंबईच्या धर्मशाळेत आश्रय देणारे प्रशांत देशमुख यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे राजभवनात आयोजित एका सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार डॉ. विकास महात्मे, महेश्वर संस्थानचे युवराज यशवंतराव होळकर व सांगा फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर धपाटे उपस्थित होते.

फोटो:

Web Title: Prashant Deshmukh Ahilyabai Holkar honored with National Award