बदलत्या हवामानाला अनुकूल पीकपद्धतीचा अवलंब करणे गरजेचे- प्रदीप इंगोले
By Admin | Updated: January 9, 2015 01:23 IST2015-01-09T01:23:24+5:302015-01-09T01:23:24+5:30
बदलत्या हवामानाचा पिकांवर होणारा परिणाम या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन.

बदलत्या हवामानाला अनुकूल पीकपद्धतीचा अवलंब करणे गरजेचे- प्रदीप इंगोले
अकोला : हवामानातील बदल प्रखरतेने जाणवू लागले आहेत. त्यामुळे यापुढे बदलत्या हवामानाला अनुकूल पीकपद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी केले.
कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक कृषितंत्रज्ञानाचा प्रसार प्रभावीपणे करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या आर्थिक साहाय्यातून विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये १३ कृषी विज्ञान केंद्रे कार्यर त आहेत. या विज्ञान केंद्राच्या विषयतज्ज्ञांकरिता मनुष्यबळ विकासाच्या दृष्टीने विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने कें द्राचे कार्यक्रम समन्वयक आणि विषयतज्ज्ञांना बदलत्या हवामानाचा पिकांवर होणारा परिणाम या विषयावर विस्तार शिक्षण संचालनालय व क्षेत्रीय प्रकल्प संचालनालय (हैद्राबाद) यांच्यावतीने ८ व ९ जानेवारी असे दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उदघाटन गुरुवारी डॉ. इंगोले यांनी केले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला कृषी अधिष्ठाता डॉ. विलास भाले, कृषी हवामान विभागप्रमुख डॉ. एस. एस. वंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. वातावरणातील बदलांचे सूक्ष्म अवलोकन करू न शेतकर्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन डॉ. इंगोले यांनी केले.