भारतीय कॅरम संघाच्या व्यवस्थापकपदी प्रभजितसिंह बछेर

By Admin | Updated: September 7, 2014 01:27 IST2014-09-07T01:27:34+5:302014-09-07T01:27:34+5:30

विश्‍वचषक कॅरम स्पर्धेसाठी व्यवस्थापकपदी प्रभजितसिंह बछेर यांची निवड

Prabhjitsinh Bachher as the manager of the Indian Carrom team | भारतीय कॅरम संघाच्या व्यवस्थापकपदी प्रभजितसिंह बछेर

भारतीय कॅरम संघाच्या व्यवस्थापकपदी प्रभजितसिंह बछेर

अकोला: मालदिव येथे १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत होणार्‍या विश्‍वचषक कॅरम स्पर्धेसाठी अधिकार्‍यांची निवड विशाखापट्टणम येथे झालेल्या ऑल इंडिया कॅरम फेडरेशनच्या आमसभेत घोषित करण्यात आली. स्पर्धेचे चिफ द मिशन म्हणून आसामचे मंत्री हकिबुल हुसेन, व्यवस्थापकपदी फेडरेशनचे महासचिव प्रभजितसिंह बछेर (विदर्भ- अकोला) यांची निवड झाली आहे.
भारतीय संघामध्ये डॉ. निरज संपथी आंध्र प्रदेश, तांत्रिक संचालक उदयकुमार पाँडेचरी, पो. रवींद्रन केरळ यांची निवड झाली आहे. पुरुष खेळाडू के. श्रीनिवास पेट्रोलियम, रियाज अली अकबर व मोहम्मद गुफरान एअर इंडिया, पी.आकाश रिझर्व्ह बँक, महिला खेळाडू रश्मीकुमार पेट्रोलियम, कविता सोमांची रिझर्व्ह बँक, काजल कुमारी पेट्रोलियम, जयश्री तामिळनाडू यांचा समावेश आहे. स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी ६ ते ११ सप्टेंबर या कालावधीत त्रिवेंद्रम येथे प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली आहे. विशाखापट्टणमचे दिनेश मोदी यांनी स्पर्धेच्या तयारीसाठी एक लाखाची देणगी दिली आहे. इंटरनॅशनल कॅरम फेडरेशनचे सेक्रेटरी जनरल एस.के.शर्मा व मालदिव कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष मुबीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची तयारी सुरू आहे.

Web Title: Prabhjitsinh Bachher as the manager of the Indian Carrom team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.