प्रभातचे बास्केटबॉलपटू विभागीयस्तरावर

By Admin | Updated: August 21, 2015 22:31 IST2015-08-21T22:31:47+5:302015-08-21T22:31:47+5:30

जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या स्पर्धेत पटकाविले विजेतेपद.

Prabhat basketballer at departmental level | प्रभातचे बास्केटबॉलपटू विभागीयस्तरावर

प्रभातचे बास्केटबॉलपटू विभागीयस्तरावर

अकोला: जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत प्रभात किडस डे बोर्डिंग स्कूल संघाने १४ व १७ वर्षाआतील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकाविले. दोन्ही संघाची निवड विभागीयस्तर स्पर्धेसाठी झाली. स्पर्धा १९ व २0 ऑगस्ट रोजी स्पर्धा वसंत देसाई क्रीडांगण येथे झाली.
विजेता संघामध्ये १४ वर्षाआतील गटात प्रशिक गोपनारायण, आर्यन इंगळे, प्रथमेश जोशी, कृष्णा चौधरी, यशोवर्धन जुमळे, अखिलेश सोनी, आर्यन रोम, रिषभ सुरेका, योगीराज मांडेकर, विक्रम मंत्री, उत्कर्ष सालफळे, शंतनू जोशी तसेच १७ वर्षाआतील गटामध्ये सौरभ यादगिरे, देवल गावंडे, कुणाल देठे, अमन शुक्ला, पार्थ शहा, संकेश शहा, आकाश बर्डे, विवेक मुरू मकार, देवेश खंडारे, सौरभ ठाकरे, श्रेयश झापे यांचा समावेश आहे. खेळाडूंना शाळा क्रीडा विभाग प्रमुख संतोष लोमटे, प्रशिक्षक आशिष बेलोकार यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंचे प्राचार्य कांचन पटोकार, उपप्राचार्य वृषाली वाघमारे यांनी कौतूक केले.

Web Title: Prabhat basketballer at departmental level