लोकप्रतिनिधींचे फलक कायमच; मनपासह भाजप कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 14:18 IST2019-10-01T14:17:13+5:302019-10-01T14:18:03+5:30
शहरातील काही भागात लोकप्रतिनिधींचे फलक अद्यापही कायमच उघडे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

लोकप्रतिनिधींचे फलक कायमच; मनपासह भाजप कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष
अकोला: विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता २१ सप्टेंबर रोजी लागू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकास कामांच्या उद्घाटनाचे फलक, बोर्ड काढून घेण्यासोबतच काही फलक झाकण्याची कार्यवाही केली होती. यासंदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा कार्यकर्त्यांना आवाहन करीत असे फलक किंवा बोर्ड झाकण्याचे निर्देश दिले होते. तरीही शहरातील काही भागात लोकप्रतिनिधींचे फलक अद्यापही कायमच उघडे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मनपासह भाजप कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष अंगलट येण्याची चिन्ह आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे मतदारांवर प्रभाव निर्माण करतील, असे कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक, पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकास कामांच्या उद्घाटनाचे फलक काढून घेण्याचे अथवा ते झाकून ठेवणे अपेक्षित आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने कार्यवाही करण्याची गरज आहे. २१ सप्टेंबर रोजी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने रात्री व दुसºया दिवशी असे फलक काढणे अथवा झाकून ठेवण्याची कार्यवाही पार पाडली. दहा दिवस उलटून गेल्यावरही शहरातील काही भागात लोकप्रतिनिधींच्या विकास कामांचे फलक, बोर्ड कायमच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हा प्रकार पाहता मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
भाजप नगरसेवक, कार्यकर्त्यांना विसर?
शहराच्या कानाकोपºयात, गल्लीबोळात भाजपच्या विकास कामांचे फलक आहेत. अर्थातच, याची संबंधित प्रभागाचे नगरसेवक, बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांसह मंडळ अध्यक्षांना पूर्ण जाणीव आहे. मध्यंतरी असे फलक काढून घेण्यासंदर्भात भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहनसुद्धा केले होते. या आवाहनाचा कार्यकर्त्यांना विसर पडला की काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.