राज्यातील खरिपाची स्थिती निराशाजनक!

By Admin | Updated: July 21, 2014 00:23 IST2014-07-21T00:23:36+5:302014-07-21T00:23:36+5:30

खरिपातील सर्वच पिकांची स्थिती निराशाजनक आहे.

Poor state is disappointing! | राज्यातील खरिपाची स्थिती निराशाजनक!

राज्यातील खरिपाची स्थिती निराशाजनक!

अकोला: यावर्षी दीड महिना उशिराने पावसाळा सुरू झाल्याने खरिपातील सर्वच पिकांची स्थिती निराशाजनक आहे. असे असले तरी, कृषी अर्थशास्त्र, सांख्यिकी विभागाने तूर, मूग, सोयाबीन व मका या पिकांना भविष्यात मिळणार्‍या भावांचे समाधानकारक भाकीत वर्तविल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुगाला पाच, सोयाबीनला तीन हजार चारशे, तुरीला चार हजार पाचशे तर मका या पिकाला १२८0 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणार असल्याचे या विभागाने म्हटले आहे.
गत दहा वर्षांत प्रथमच पावसाला दीड महिना विलंब झाल्याने शेतकर्‍यांना उशिराने पेरणी करावी लागली. मूग व उडिदाचे पीक तर हातचे गेलेच आहे. सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांची शेतकर्‍यांनी प्रतिकूल स्थितीत पेरणी केली आहे. त्यामुळे या सर्व पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापृष्ठभूमीवर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या एन.सी.ए. पी. (कृषी माल विपणन माहिती केंद्र), अर्थशास्त्र सांख्यिकी विभागाने तूर, मूग, सोयाबीन व मका या पिकांना भविष्यात मिळणार्‍या भावांचे भाकीत वर्तवून शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी कृषी माल विपणन केंद्राने लातूर येथील बाजारपेठेत मागील १५ वर्षांंत तूर या पिकाला मिळालेल्या भावाचे पृथ्थकरण केले आहे. या निष्क र्षानुसार, काढणीच्या वेळी बाजारात तुरीचे भाव हे सरासरी किमतीच्या ४४00 ते ४५00 राहण्याची शक्यता केंद्राने वर्तविली आहे. सोयाबीनच्या १२ ते १६ वर्षांंतील अकोला, वाशिम व लातूर या बाजारपेठेतील मासिक सरासरी किमतीचे पृथ्थकरण करण्यात आले आहे. या निष्कर्षानुसार येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची सरासरी किंमत ३२00 ते ३४00 रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता केंद्राने वर्तविली आहे. मूग या पिकाचे लातूर बाजारपेठेतील मागील १६ वर्षांंतील सरासरी किमतीचे पृथ्थकरण करण्यात आले आहे. या अभ्यासानुसार येत्या सप्टेंबर महिन्यात सरासरी किमतीच्या ४८00 ते ५,000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title: Poor state is disappointing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.