माझोड-हिंगणा फाटा रस्त्याची दयनीय अवस्था !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:24 IST2021-08-25T04:24:26+5:302021-08-25T04:24:26+5:30
- परशराम बोबडे, शेतकरी माझोड. ----------------------- गेल्या काही दिवसांपासून रस्त्याची चाळण झाली आहे. पाऊस सुरू असल्यास या मार्गाने वाहतूक ...

माझोड-हिंगणा फाटा रस्त्याची दयनीय अवस्था !
- परशराम बोबडे, शेतकरी माझोड.
-----------------------
गेल्या काही दिवसांपासून रस्त्याची चाळण झाली आहे. पाऊस सुरू असल्यास या मार्गाने वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. या मार्गावर अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. रस्त्याअभावी शेतीच्या आंतर मशागतीच्या कामांवर परिणाम होत आहे.
- रामा सिरसाट, युवा शेतकरी, कळंबेश्वर.
-------------------
गोरेगाव येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या मार्गावरील एसटी बंद झाल्याने नागरिकांना माझोड पर्यंत पायी जावे लागते. प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यानेच या रस्त्याचे काम धीम्या गतीने सुरू आहे. गोरेगाववासीयांना पर्यायी मार्ग कापशी मार्गे अकोला जावे लागते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
-अजय शेगावकर, गोरेगाव.
-----------------------------
एसटी बंद ; खासगी वाहनचालकांकडून लूट
हिंगणा फाटा - कळंबेश्वर - गोरेगाव - माझोड रस्त्याची चाळण झाले असून, या मार्गाने एसटी बससेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसटी बस बंद व रस्त्याची दुर्दशा यामुळे खासगी प्रवासी वाहनचालक प्रवाशांकडून दुप्पटीने भाडे वसूल करीत असल्याचे चित्र आहे.
----------------------------
‘ मत मागायला गावात या फक्त ! ’
रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे ; मात्र याकडे प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधींचे ही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. काही स्थानिकांनी या मार्गावरील नाल्यांवर ‘मत मागायचे पुरतेच गावात या फक्त’, असे लिहून संताप व्यक्त केल्याचे दिसून येते.
--------------------------