पूजा फॅशनच्या मान्सून सेलला महिला, युवतींकडून भरभरून प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST2021-09-10T04:26:00+5:302021-09-10T04:26:00+5:30

अकोला : शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात महिलांकरिता विशेषत: युवतींकरिता सुपरिचित असलेल्या स्थानिक राठी मार्केटमधील पूजा फॅशन्समध्ये मागील महिनाभरापासून ...

Pooja Fashion's Monsoon Cell gets overwhelming response from women and girls | पूजा फॅशनच्या मान्सून सेलला महिला, युवतींकडून भरभरून प्रतिसाद

पूजा फॅशनच्या मान्सून सेलला महिला, युवतींकडून भरभरून प्रतिसाद

अकोला : शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात महिलांकरिता विशेषत: युवतींकरिता सुपरिचित असलेल्या स्थानिक राठी मार्केटमधील पूजा फॅशन्समध्ये मागील महिनाभरापासून मान्सून सेल सुरू आहे. या सेलला दिवसेंदिवस वाढताच भरभरून प्रतिसाद मिळत असून, ग्राहकांना २० ते ५० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. हा सेल दरवर्षी फक्त एक महिन्याकरिताच ठेवण्यात येत असतो. मात्र, यावर्षी खास ग्राहकांच्या आग्रहास्तव हा सेल काही दिवस वाढविण्यात आला होता.

विशेष म्हणजे येथे जेव्हा पाहावं तेव्हा नवनवीन पॅटर्न व आकर्षक डिझाईन्स भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे मनपसंत खरेदीचा आनंद घेतला जातो, असे ग्राहकांकडून नेहमी ऐकावयास मिळते. येथे ड्रेस मटेरियल, सुटस्, कुर्तीज, लेगिंग्ज, जिन्स, टॉप, टी शर्ट व नाईटवेअर भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. हा सेल थोड्याच दिवसांसाठी उपलब्ध असून, ही शेवटची संधी आहे. तरी युवती, महिलांनी या सेलमध्ये खरेदी करून अवश्य फायदा घ्यावा, असे संचालक गौरव राठी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

फोटो

Web Title: Pooja Fashion's Monsoon Cell gets overwhelming response from women and girls