‘पांग’ कादंबरीचा विमोचन सोहळा

By Admin | Updated: November 10, 2014 01:08 IST2014-11-10T01:08:35+5:302014-11-10T01:08:35+5:30

बालरोग तज्ज्ञ डॉ. श्रीकांत देशपांडे लिखित ‘पांग’ या इंग्रजी कादंबरीचे विमोचन.

'Pong' Novel Release Function | ‘पांग’ कादंबरीचा विमोचन सोहळा

‘पांग’ कादंबरीचा विमोचन सोहळा

अकोला : बालरोग तज्ज्ञ डॉ. श्रीकांत देशपांडे लिखित  'पांग' या इंग्रजी कादंबरीचा विमोचन सोहळा रविवार, ९ नोव्हेंबर रोजी आयएमए सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबईच्या प्रसिद्ध साहित्यिका डॉ. अल्का मांडके, नागपूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर व साहित्यिक प्रकाश एदलाबादकर उपस्थिती होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी श्रीकांत देशपांडे यांनी आपली कादंबरी डॉ. रूहाटिया यांना सर्मपित असल्याचे स्पष्ट केले. इतर मान्यवरांनीदेखील विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन मोहिनी मोडक यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील विविध डॉक्टरांसह अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते.

Web Title: 'Pong' Novel Release Function