निवडणुकीच्या नावाखाली पोलिसांची दादागिरी

By Admin | Updated: October 15, 2014 01:42 IST2014-10-15T01:36:07+5:302014-10-15T01:42:01+5:30

अकोला येथील टिळक रोडवरील व्यापा-यांना अश्लील शिवीगाळ.

Police's dadagiri in the name of election | निवडणुकीच्या नावाखाली पोलिसांची दादागिरी

निवडणुकीच्या नावाखाली पोलिसांची दादागिरी

अकोला: निवडणुकीदरम्यानच्या गस्तीच्या नावाखाली पोलिस दादागिरी करीत असल्याची घटना १0.३0 वाजताच्या सुमारास घडली. दुकाने बंद करण्यासाठी गस्तीवर असलेल्या कोतवाली पोलिस ठाण्यातील एका एपीआयने टिळक रोडवरील व्यापार्‍यांना अश्लील शिवीगाळ केली. संतप्त झालेल्या २0 ते २५ व्यापार्‍यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली होती.
मंगळवारी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास टिळक रोडवरील व्यापारी आपली दुकाने बंद करण्याच्या तयारीत असताना, कोतवाली पोलिस ठाण्यातील एका एपीआयसह त्यांचा पोलिस ताफा गस्तीवर निघाला. एपीआयने व्यापार्‍यांना अश्लील शिवीगाळ करून त्यांना दुकाने बंद करण्यास सांगितले. अन्यथा लाठीने मारहाण करण्याची धमकी दिली. एपीआयच्या या प्रकारामुळे व्यापारी संतप्त झाले आणि त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यावर धाव घेऊन या एपीआयविरुद्ध कारवाईची मागणी केली. व्यापार्‍यांनी सहायक पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही बाब घातली; परंतु त्यांनी व्यापार्‍यांना शांत राहण्याची विनंती केली.

Web Title: Police's dadagiri in the name of election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.