दुचाकी अपघातात पोलीस शिपाई ठार; एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:13 IST2021-06-11T04:13:55+5:302021-06-11T04:13:55+5:30

नीलेश रमेश डाबेराव (४०, रा. सांगवा मेळ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दुचाकीवर मागे बसलेले राहुल शंकर शिरसाट ...

Policeman killed in two-wheeler accident; One person was injured | दुचाकी अपघातात पोलीस शिपाई ठार; एक जण जखमी

दुचाकी अपघातात पोलीस शिपाई ठार; एक जण जखमी

नीलेश रमेश डाबेराव (४०, रा. सांगवा मेळ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दुचाकीवर मागे बसलेले राहुल शंकर शिरसाट (३८, रा. सांगवा मेळ) हे किरकोळ जखमी झाले.

मूर्तिजापूर - कौलखेड मार्गाने मूर्तिजापूरवरून गावी परत जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. या अपघातात मुंबई पोलीस दलात असलेले नीलेश डाबेराव हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने अकोला येथे नेत असतानाच, त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. नीलेश डाबेराव व राहुल शिरसाट हे एमएच ३० एएच ८७७० या क्रमांकाच्या दुचाकीने सांगवा मेळ येथे जात असताना दुचाकीचा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष संजय नाईक यांनी तातडीने एका खासगी वाहनाच्या मदतीने जखमींना अकोला येथे उपचारासाठी पाठविले. नीलेश डाबेरावचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

फोटो: मूर्तिजापूर ॲक्सिडेंट नावाने

Web Title: Policeman killed in two-wheeler accident; One person was injured