गावक-यांकडून पोलिसांच्या वाहनाची तोडफोड

By Admin | Updated: March 29, 2016 02:35 IST2016-03-29T02:33:06+5:302016-03-29T02:35:32+5:30

मंगरूळपीर तालुक्यातील अपघात: माजी सैनिक जागीच ठार.

Police vehicle seized from villagers | गावक-यांकडून पोलिसांच्या वाहनाची तोडफोड

गावक-यांकडून पोलिसांच्या वाहनाची तोडफोड

मंगरूळपीर (जि. वाशिम): तालुक्यातील भूर फाट्यानीक अकोल्याकडून येणार्‍या भरधाव मेटॅडोरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळावर पोहचण्यात पोलिसांना दोन तास विलंब झाल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी उशिरा आलेल्या पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करून त्यांचा संताप व्यक्त केला.
अकोल्यावरून येणार्‍या एम.एच.३0 एल.४८७६ क्रमांकाच्या मेटॅडोरने माजी सैनिक गजानन तुळशीराम कुरवाडे (४५) यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. सदर घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली; मात्र पोलिसांनी या अपघाताची तत्काळ दखल घेतलीच नाही. पोलीस जवळपास दोन तास उशिरा पोहचल्यामुळे संप्तत झालेल्या लोकांनी पोलिसांच्या जीपवर जोरदार दगडफेक केली. यात वाहनाचे नुकसान झाले; मात्र या घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.

Web Title: Police vehicle seized from villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.