ईदच्या पृष्ठभूमीवर पोलिसांचे पथसंचलन
By Admin | Updated: July 21, 2014 00:45 IST2014-07-21T00:29:00+5:302014-07-21T00:45:58+5:30
पोलिसांनी शहरातील अतिसंवेदनशील भागामध्ये पथसंचलन केले.

ईदच्या पृष्ठभूमीवर पोलिसांचे पथसंचलन
अकोला : रमजान ईद व हिंदू सणांच्या पृष्ठभूमीवर शहराची कायदा व सुव्यवस्था बाधित होऊन या दृष्टिकोनातून रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोलिसांनी शहरातील अतिसंवेदनशील भागामध्ये पथसंचलन केले. यावेळी दंगा नियंत्रण पथकाने दंगा नियंत्रणाचे प्रात्यक्षिकही केले.
२९ जुलै रोजी रमजान ईद, नागपंचमी आणि श्रावण महिन्याच्या पृष्ठभूमीवर शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये व कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, यासाठी पोलिस दलाकडून खबरदारी घेण्यात येते. रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कोतवाली पोलिस ठाण्यातून पोलिस पथसंचलन काढण्यात आले. या पथसंचलनामध्ये पोलिस निरीक्षक अनिरुद्ध आढाव यांच्या नेतृत्वात रामदासपेठ, जुने शहर, खदान, सिव्हिल लाईन आणि कोतवाली पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्यांसह राखीव पोलिस दलाचे जवान सहभागी झाले होते.
शहरातील टिळक रोड, कापड बाजार, अलंकार मार्केट, आकोट स्टँड, सुभाष चौक, दीपक चौक, फतेह चौक, गांधी चौक मार्गावर पोलिसांनी सशस्त्र पथसंचलन केले.