काटेलचा इसम विष प्राशन करून पोहोचला पोलीस स्टेशनात

By Admin | Updated: February 19, 2017 02:24 IST2017-02-19T02:24:55+5:302017-02-19T02:24:55+5:30

उपचारासाठी पोलिसांनी अकोल्यास हलविले

In the police station, Katle's poison reached the poison | काटेलचा इसम विष प्राशन करून पोहोचला पोलीस स्टेशनात

काटेलचा इसम विष प्राशन करून पोहोचला पोलीस स्टेशनात

हिवरखेड (जि. अकोला), दि. १८- एका ३५ वर्षीय इसमाने १८ फेब्रवारी रोजी थेट हिवरखेड पोलीस स्टेशन गाठून विष प्राशन केले असल्याचे सांगितले. या इसमावर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पोलिसांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी अकोल्यास हलविले आहे.
बाळू शालीग्राम वानखडे, असे या इसमाचे नाव आहे. हा इसम नजीकच्या काटेल येथील रहिवासी असून, त्याचे सासरे हिवरखेड येथील रहिवासी आहेत. बाळू वानखडे याने १८ फेब्रुवारी रोजी विष प्राशन केले. त्यानंतर दुपारी ४ वाजता हिवरखेड पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्याच्या तोंडास विष प्याल्यासारखा उग्र दर्प येत असल्याने पोलिसांनी त्याला तत्काळ स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे त्याच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. शेगोकार यांनी प्रथमोचार करून पुढील उपचारार्थ अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात रवाना केले. या इसमाने विष का घेतले, त्याचे कारण समजू शकले नाही.

Web Title: In the police station, Katle's poison reached the poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.