पोलिसांचा जुगार अड्डय़ावर छापा; पाच सट्टेखोरांना अटक
By Admin | Updated: July 27, 2016 01:48 IST2016-07-27T01:48:42+5:302016-07-27T01:48:42+5:30
तेल्हारा तालुक्यातील घटना; १७ हजाराचा ऐवज जप्त.

पोलिसांचा जुगार अड्डय़ावर छापा; पाच सट्टेखोरांना अटक
तेल्हारा (जि. अकोला): घोडेगाव मार्गावर सार्वजनिक आमरोडनजीक आर.के. बार रेस्टॉरंटजवळ तेल्हारा येथे सोमवार २५ जुलै २0१६ रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास तेल्हारा पोलिसांनी बावन्न ताश पत्त्यांचा जुगार खेळणार्या पाच आरोपींना छापा टाकू न रंगेहात पकडले आहे. तेल्हारा ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचासमक्ष पोलीस स्टाफच्या मदतीने सोमवार २५ जुलै २0१६ रोजी वर दर्शविलेल्या ठिकाणी छापा टाकून बावन्न ताशपत्त्यांचा तीन पानी परेल नावाचा खेळ पैशाच्या हारजीतवर खेळणार्या अनुक्रमे मनोहर रामचंद्र भटकर, हरिभाऊ, महादेव अढाव, शेख आरिफ शेख सलावत सर्व रा. बेलखेड, ता. तेल्हारा, अमोल गणेश ढुंडे रा. वरुड बिहाडे, राजेश बाळकृष्ण दामले रा. तेल्हारा या पाच आरोपींना रंगेहात पकडले. आरोपींच्या ताब्यातून बावन्न ताशपत्ते तसेच १७,२00 रुपये असा माल जप्त करण्यात आला. हे.काँ. गणपत गवळी याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.