गायगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By Admin | Updated: May 3, 2017 01:24 IST2017-05-03T01:24:03+5:302017-05-03T01:24:03+5:30

अकोला : गायगाव येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी छापा टाकून चार हजार ८०० रुपये, १४ मोबाइल, दुचाकीसह एक लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Police raid on gambha at Gagagaon | गायगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

गायगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

१४ जणांना अटक : मुद्देमाल जप्त

अकोला : गायगाव येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी छापा टाकून चार हजार ८०० रुपये, १४ मोबाइल, दुचाकीसह एक लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यासोबतच १४ जणांना अटकही केली आहे.
गायगाव शेतशिवारात जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारावर पोलिसांनी छापा टाकून गायगाव येथे राहणारे संतोष भगेवार (२४), जबर खान पठाण (२६), शेख रहिस शेख इस्माइल (२४), विलास पांडुरंग आगरकर (२५), वासुदेव भीमसिंग जाधव (३१), सचिन गुलाबराव वानखडे (२४), बाळू गुलाब बांगर (५०), किशन नथ्थू अवचार (५७), बाबाराव लक्ष्मण वानखडे (६४), शेख अनिस शेख इस्माइल (२७), मोहम्मद जाफर मोहम्मद फारूख (२७) संजय त्र्यंबक खेतकर (४२), संजय लक्ष्मण नावडकर (४४), कैलास पांडुरंग आगरकर (२८) यांना रंगेहात अटक केली.
त्यांच्याकडून तीन हजार ७०० रुपये रोख, ४८ हजार रुपयांचे १४ मोबाइल, तीन दुचाकी, बावन्नतास पत्ते असा एकूण एक लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

Web Title: Police raid on gambha at Gagagaon