पोलीस कर्मचा-यास मारहाण; गुन्हा दाखल

By Admin | Updated: March 15, 2017 02:47 IST2017-03-15T02:47:00+5:302017-03-15T02:47:00+5:30

निवडणुकीतील पराभवाच्या कारणावरून मारहाण.

Police personnel assault; Filed the complaint | पोलीस कर्मचा-यास मारहाण; गुन्हा दाखल

पोलीस कर्मचा-यास मारहाण; गुन्हा दाखल

अकोला, दि. १४- पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचार्‍यास निवडणुकीतील पराभवाच्या कारणावरून सदर कर्मचारी ड्युटीवर नसताना मारहाण झाल्याची घटना सोमवारी घडली.
पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी कुणाल रमेश सोनोने हे राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्यावर सोमवारी सायंकाळी जेवण करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्याच बाजूला सागर चव्हाण नामक युवकही जेवण करीत होता. पूर्ववैमनस्य तसेच मनपा निवडणुकीतील जय-पराजयाच्या कारणावरून या दोघांमध्ये बोलचाल झाली. त्यानंतर दोघांमध्येही हाणामारी झाल्याने सागर चव्हाण याने सोनोने यांना चाकू मारला. यामध्ये सोनोने जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अहवालावरून व सोनोने यांनी दिलेल्या तक्रारीवरून सागर चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Police personnel assault; Filed the complaint