पोलीस मुख्यालयासमोरच सुरू होता जुगार अड्डा!

By Admin | Updated: June 3, 2017 01:36 IST2017-06-03T01:36:20+5:302017-06-03T01:36:20+5:30

सहा अटकेत: सहा फरार; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Police headquarter started in front of gambling haunted! | पोलीस मुख्यालयासमोरच सुरू होता जुगार अड्डा!

पोलीस मुख्यालयासमोरच सुरू होता जुगार अड्डा!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पोलीस मुख्यालयासमोर मिश्रा नामक व्यक्तीच्या जुगार क्लबवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी शुक्रवारी छापा मारला. यावेळी सहा जुगारींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अनिकट परिसरात गत काही दिवसांपासून मिश्रा नामक इसमाचा जुगार क्लब मोठ्या जोरात सुरू आहे. या जुगार क्लबवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी यापूर्वी एका महिन्याच्या कालावधीत दोन वेळा छापा टाकून जुगारींना अटक केली होती.
त्यानंतरही शुक्रवारी हा क्लब सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अळसपुरे यांनी पथकासह जुगार क्लबवर छापा टाकून सहा जुगारींना ताब्यात घेतले. यामध्ये हनुमान आखाडा येथील रहिवासी संजय नारायण रत्नपारखी, खोलेश्वरमधील तुफानीलाल गयादीन यादव, हरिहरपेठ येथील पंकज दीपक उगडे, कैलास टेकडी येथील रहिवासी अशोक श्ंकरराव शाहू, महात्मा फुले नगरातील रहिवासी दिलीप विजय वर्मा आणि सिंधी कॅम्पमधील रहिवासी शेख करीम शेख इस्माईल यांचा समावेश आहे.
या जुगारींकडून रोख, तीन मोबाइल, दुचाक्या तीन, एक पंखा आणि पाण्याची कॅन असा एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार क्लब चालविणाऱ्या मिश्रासह सहा जण फरार झाले असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मिश्रा नामक इसमाचा क्लब गत एक महिन्यापासून चर्चेत आला असून, या ठिकाणावर विशेष पथकाने तिसरी कारवाई केली आहे. त्यामुळे सिटी कोतवाली पोलिसांची हप्तेखोरी उघड झाली असल्याची चर्चा अकोला शहराच्या पोलीस वर्तुळात दिवसभर होती.

Web Title: Police headquarter started in front of gambling haunted!