दुचाकी चोरट्यास पोलीस कोठडी

By Admin | Updated: July 18, 2016 02:13 IST2016-07-18T02:13:25+5:302016-07-18T02:13:25+5:30

दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

Police custody of two-wheeler gang | दुचाकी चोरट्यास पोलीस कोठडी

दुचाकी चोरट्यास पोलीस कोठडी

अकोला: रेल्वे स्टेशन परिसर व शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरी करणार्‍या एका अट्टल चोरट्यास जीआरपी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक करून रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आकोट फैल परिसरातील पूरपीडित कॉलनी येथील रहिवासी नवनाथ एकनाथ अहेर (२0) याने शहराच्या विविध भागासह रेल्वे स्टेशनसमोरील भागातून दुचाकी लंपास केल्याची माहिती जीआरपीला मिळाली. यावरून जीआरपीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी अहेर याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. रेल्वे स्टेशन परिसरातून काही दिवसांपूर्वीच एक दुचाकी चोरल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. यावरून जीआरपीने त्याच्याकडून चार चोरीच्या दुचाक्या जप्त केल्या आहेत. नवनाथ अहेर याने आणखीही दुचाक्या चोरल्याची माहिती असून पोलीस त्या दुचाक्या जप्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अहेरला न्यायालयाने १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Police custody of two-wheeler gang