इर्शाद हत्याकांडातील आरोपी पोलिस कोठडीत

By Admin | Updated: September 14, 2014 01:38 IST2014-09-14T01:38:00+5:302014-09-14T01:38:00+5:30

बहुचर्चित इर्शाद हत्याकांडातील आरोपीस १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी.

In the police custody of Irshad killer | इर्शाद हत्याकांडातील आरोपी पोलिस कोठडीत

इर्शाद हत्याकांडातील आरोपी पोलिस कोठडीत

अकोला - शहरातील बहुचर्चित इर्शाद हत्याकांडातील आरोपी बंधूना शनिवारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. इर्शाद हत्यांकाडातील फरार आरोपीमधील मोहम्मद आजम मोहम्मद हबीब आणि मोहम्मद हनीफ मोहम्मद हबीब या दोन्ही बंधूनी जिल्हा न्यायालयात आत्मसर्मपण केले होते. त्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयाने १२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी संपल्याने आरोपींना शनिवारी पुन्हा न्यायालयामध्ये हजर केले असता या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींकडून शस्त्र व इतर दस्तऐवज जप्त करावयाचे असल्याने त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी न्यायालयामध्ये केली.

Web Title: In the police custody of Irshad killer