नवोदयचे दोन्ही शिक्षक पोलीस कोठडीत
By Admin | Updated: April 14, 2015 01:49 IST2015-04-14T01:49:08+5:302015-04-14T01:49:08+5:30
विद्यार्थिनींच्या लैंगिक छळप्रकरणी दोन्ही शिक्षकांना रविवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी
_ns.jpg)
नवोदयचे दोन्ही शिक्षक पोलीस कोठडीत
अकोला - बाभूळगाव जहाँगीर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील तब्बल ४९ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळप्रकरणी राजन गजभिये आणि शैलेश रामटेके या दोन्ही शिक्षकांना रविवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नवोदय विद्यालयातील ४९ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणात अटकेत असलेले शिक्षक राजन गजभिये आणि शैलेश रामटेके यांनी पोलीस कोठडीत असताना दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका परीक्षेला बसण्यासाठी न्यायालयाला परवानगी मागितली होती. मात्र पॉस्कोच्या विशेष न्यायालयाने या दोन्ही शिक्षकांना परीक्षेत सहभागी होण्यास परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने दिल्ली येथील परीक्षेसाठी दोन्ही शिक्षकांना परवानगी दिल्यानंतर हे शिक्षक परीक्षेसाठी दिल्ली येथे गेले होते. रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास दोन्ही शिक्षकांना अकोल्यात परत आणल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या दोन्ही शिक्षकांची मंगळवारी पोलीस कोठडी संपणार असून, त्यांना मंगळवारी दुपारी पॉस्कोच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, दोन्ही शिक्षक ज्या परीक्षेसाठी दिल्लीला गेले होते, त्या परीक्षेच्या वेळेपूर्वी पोहोचले नाहीत. त्यामुळे परीक्षा न देताच दोन्ही शिक्षक रविवारी परतले.