शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातून होणार्‍या गुरांच्या तस्करीवर पोलिसांची धाडसी कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 19:47 IST

जंगलाच्या मार्गे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी व कत्तलीसाठी आणत असलेली ३५ गुरे व  ८ वाहनांसह २0 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी २८ नोव्हेंबर रोजी जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात गुरांची मोठय़ा प्रमाणात तस्करी होत असल्याचे सिद्ध झाले. 

ठळक मुद्दे३५ गुरे, ८ गाड्यांसह २0 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त!वन विभागाची भूमिका संशयास्पद

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरखेड (अकोला): जंगलाच्या मार्गे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी व कत्तलीसाठी आणत असलेली ३५ गुरे व  ८ वाहनांसह २0 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी २८ नोव्हेंबर रोजी जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात गुरांची मोठय़ा प्रमाणात तस्करी होत असल्याचे सिद्ध झाले. मध्य प्रदेशातून तलाई गेट ते बारुखेडा मार्गे महाराष्ट्रात गुरे कोंबुन गाड्यांमध्ये भरून आणल्या जात असल्याच्या गुप्त माहितीवरून हिवरखेड पोलिसांनी २७ नोव्हेंबरच्या रात्रीदरम्यान सापळा रचला. त्या अनुषंगाने बारुखेडा ते झरी गेट यादरम्यान प्रत्येक वाहनाला अडवून त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान एक, दोन नव्हे तर तब्बल ८ वाहनांमध्ये गुरे कोंबुन आणण्याचा प्रकार उघडकीस येताच ठाणेदार विकास देवरे यांनी समयसुचकता बाळगून उपविभागीय पोलीस अधिकारी, आर.सी.पी. पथक, क्यू.आर.टी. पथक यांना पाचारण केले. त्यांच्या सहकार्याने ८ वाहनांमधील तब्बल ३५ गुरांना ताब्यात घेतले. यादरम्यान अंधाराचा फायदा घेऊन वाहनचालक पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईमध्ये ८ पीकअप वाहने व ३५ गुरे असा एकूण २0 लाख रुपयांचा मुद्देमाल हिवरखेड पोलिसांनी जप्त केला आहे. गेल्या अंदाजे १0 वर्षातील पोलिसांची ही सर्वात मोठी धाडसी कारवाई असून, यामुळे गुरांची तस्करी करणार्‍या माफियांचे धाबे दणाणले आहेत.मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात ये-जा करण्यासाठी तलाई गेट व वान गेट हे दोन वन विभागाचे गेट ओलांडावे लागतात. हे दोन्ही गेट व्याघ्र प्रकल्पामुळे रात्री ७ वाजतानंतर बंद ठेवण्याचे आदेश वन विभागाला असल्याचे समजते. मग रात्री ७ नंतर या तस्कारांसाठी हे गेट कसे उघडल्या जातात व का उघडल्या जातात, असा प्रश्न याप्रसंगी निर्माण झाला आहे.या कारवाईमध्ये हिवरखेड पोलिसांनी १0 पोलीस अधिकारी व ५0 पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य घेतले असून, प्राणी संरक्षण कायदा ५, ५ अ, ९, ९ अ, ११ अ.ड.फ. प्राण्यांची निर्दयतेने वाहतूक करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेली सर्व गुरे अकोट गोरक्षण सेवा संस्था येथे रवाना करण्यात आली आहेत. कारवाईमध्ये हिवरखेडचे ठाणेदार विकास देवरे, पीएसआय शरद भस्मे, गोपाल दातिर, नंदु सुलताने, नीलेश बोरकुटे, गितेश कांबळे, नीलेश तायडे, शे. अनवर, अमोल पवार, विलास अस्वार या पोलीस कर्मचार्‍यांचा सहभाग होता.

टॅग्स :Telharaतेल्हाराCrimeगुन्हा